Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता २ टक्के वाढला
केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या वाढीमुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल. या निर्णयामुळे, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांचा महागाई मदत (DR) 53टक्केवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढेल.