Laxman Hake : सरकारचा जीआर म्हणजे ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम; लक्ष्मण हाकेंचा मराठा आरक्षणावर संताप
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयाला संविधानविरोधी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण संपवणारा निर्णय म्हटले आहे. तसेच या निर्णयाविरोधात ओबीसी समाज न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.