CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.