Hyderabad : हैदराबादमधील रस्त्याचे नाव ट्रम्प एव्हेन्यू ठेवण्याचा प्रस्ताव; गुगल-मायक्रोसॉफ्टची नावेही प्रस्तावित, भाजपने म्हटले-आधी शहराचे नाव भाग्यनगर करा
तेलंगणा सरकार हैदराबादमधील एका मुख्य रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प ॲव्हेन्यू ठेवण्याच्या तयारीत आहे. हा रस्ता हैदराबादमधील अमेरिकन दूतावासाशेजारून जातो. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर रस्त्याचे नवीन नाव निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिटपूर्वी जगाचे लक्ष वेधून घेण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.