Goldman Sachs : गोल्डमन सॅक्सने जागतिक मंदीचा अंदाज मागे घेतला; 90 दिवसांच्या टॅरिफ पॉलिसीच्या स्थगितीनंतर भीती कमी झाली
ट्रम्प यांनी त्यांच्या नवीन टॅरिफ धोरणावर ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर जागतिक गुंतवणूक कंपनी गोल्डमन सॅक्सने जागतिक मंदीचा अंदाज कमी केला आहे. ९ एप्रिल रोजी, गोल्डमनने पुढील १२ महिन्यांत मंदीची ६५% शक्यता वर्तवली. पण ट्रम्प यांच्या घोषणेच्या अवघ्या एका तासानंतर, गोल्डमनने मंदीचा अंदाज मागे घेतला.