Goldman predict : या वर्षात सोने तब्बल ₹1.30 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता; अमेरिकेत मंदीच्या भीतीमुळे गोल्डमनचे भाकीत
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे यावर्षी सोन्याचा भाव प्रति औंस ४,५०० डॉलर (प्रति १० ग्रॅम १.३० लाख रुपये) पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज परदेशी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. तथापि, हे तेव्हाच घडेल जेव्हा व्यापार युद्ध आणि मंदीचा धोका आत्यंतिक पातळीवर पोहोचेल.