Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी
गुरुग्राम, हरियाणा येथील माजी खासदार आणि आघाडीच्या रिअल इस्टेट फर्मच्या संस्थापकास कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने धमक्या मिळाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंग जौनपुरिया हे रिअल इस्टेट डेव्हलपर एसएस ग्रुपचे संस्थापक देखील आहेत. त्यांच्याकडे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये सर्वात मोठ्या लँड बँक आहेत.