Goa Police : गोवा पोलिसांची मोठी कारवाई, ११ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त
गोव्यात ११.६७ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक वीड बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गोव्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ड्रग्ज जप्ती असल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिस गुन्हे शाखेच्या प्रवक्त्याने सांगितले की, पणजी आणि मापुसा शहरांदरम्यान असलेल्या गुरीम गावातून शनिवारी या व्यक्तीला अटक करण्यात आली.