Goa fair : गोव्यातील जत्रेत चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी
गोव्यातील शिरगाव येथे शुक्रवारी संध्याकाळी श्री लैराई जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी माध्यमांमध्ये ही बातमी आली. या अपघातात ४० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी २० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो.