PM Modi : मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान; द ग्रेट ऑनर निशाण मिळवणारे पहिले जागतिक नेते बनले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपियाने मंगळवारी आपला सर्वोच्च सन्मान दिला. ते ‘द ग्रेट ऑनर निशां ऑफ इथिओपिया’ हा सन्मान मिळवणारे पहिले जागतिक नेते बनले आहेत. या प्रसंगी पंतप्रधानांनी सांगितले की, हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या इथिओपिया दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.