Vladimir Putin : जागतिक आर्थिक शक्तीचे केंद्र बदलत आहे’; BRICS आता G-7 पेक्षा मोठा, भारताचे कौतुक करत पुतिन यांचा पश्चिमेला टोला
रशियाचे अध्यक्ष Vladimir Putin यांनी जगाच्या आर्थिक समीकरणांमध्ये मोठा बदल होत असल्याचा दावा करत BRICS समूह आता G-7 देशांपेक्षा अधिक प्रभावशाली आर्थिक शक्ती बनल्याचे म्हटले आहे. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचात (SPIEF) बोलताना त्यांनी भारताचे विशेष कौतुक केले आणि भारताने परकीय दबावाला बळी न पडता स्वतंत्र परराष्ट्र धोरण कायम ठेवले असल्याचे सांगितले.