Gilgit-Baltistan : गिलगिट-बाल्टिस्तानामध्येही पाक लष्कराने आपले युनिट वाढवले; तोयबा-जैशला हल्ल्याची भीती
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. भारतीय लष्करी हल्ल्याची शक्यता असल्याने पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला आहे. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या पंजाब प्रांतातील मुरीदके व बहावलपूर येथील ठिकाणांवर हल्ल्याची भीती आहे. या ठिकाणांवरील मशीद आणि मदरसे आता रिकामे झाले आहेत.