Rajasthan : राजस्थानात जबरदस्ती धर्मांतर केल्यास जन्मठेपेची शिक्षा; घरवापसी हे धर्मांतर मानले जाणार नाही
रविवारी होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी, भजनलाल मंत्रिमंडळाने काही सुधारणांसह राजस्थान बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी दिली आहे. विधेयकाच्या नवीन मसुद्यात, जबरदस्तीने धर्मांतर केल्यास जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेसह कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.