George Soros : जॉर्ज सोरोसशी संबंधित असलेल्या OSF या संघटनेवर EDची कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या समर्थित संघटना ओएसएफ (ओपन सोसायटी फाउंडेशन) आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांवर कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीने बंगळुरूमधील ओएसएफ आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा छापा टाकण्यात आला.