General Chauhan : डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार, जनरल चौहान यांचे आवाहन
भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके दिवसेंदिवस वाढत असून ते केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिलेल्या भाषणात या धोक्यांची सविस्तर चर्चा करत सहा प्रमुख आव्हाने अधोरेखित केली. सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार आहे असे आवाहन त्यांनी केले.