General Asim Munir : खोट्या यशाच्या फुशारक्या; पराभव झाकण्यासाठी जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पद!
भारतीय लष्कराकडून झालेल्या दारुण पराभवावर पांघरूण घालण्यासाठी आणि जनतेच्या मनात बनवटा अभिमान निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ पदावर पदोन्नती दिली आहे. १९५९ नंतर हे पद दिलं गेलेलं हे केवळ दुसरं उदाहरण असून, यामागे खऱ्या शौर्यापेक्षा राजकीय प्रदर्शन अधिक दिसून येत आहे.