Adani Group : अदानी ग्रुप 2032 पर्यंत 5.34 लाख कोटींची गुंतवणूक करणार, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशनवरही फोकस
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने पुढील सात वर्षांत (आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत) वीज उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशन-वितरणात सुमारे ६० अब्ज डॉलर्स (सुमारे ५.३४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश भारताची वेगाने वाढणारी वीज मागणी पूर्ण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यास मदत करणे आहे.