Gaurav Ahuja : रस्त्यात अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पुणे पोलिसांच्या ताब्यात; वैद्यकीय चाचणीत अल्कोहोलचे प्रमाण आढळले
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात दारूच्या नशेत भररस्त्यात बीएमडब्ल्यू उभी करून लघुशंका आणि अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री सातारा जिल्ह्यातील कराड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्याआधी त्याने एक व्हिडिओ जारी करत माफी मागितली होती.