Gargai Dam : मुंबईच्या भविष्यासाठी गारगाई धरणाच्या कामाला गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक संपन्न झाली. यावेळी गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी देण्यासाठी सहमती देण्यात आली. तसेच परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करणे आणि या मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.