Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते. तसेच दोन्ही नेत्यांच्या कुटुंबीयांनी स्नेहभोजन देखील केले होते. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.