CM Fadnavis : ठाकरे बंधूंना एकत्र राहण्याची सुबुद्धी मिळो; मुख्यमंत्री फडणवीसांचे अमेरिकेच्या टॅरिफवरही भाष्य
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीगणेशाने दोन्ही भावांना सुबुद्धी दिली आहे. त्यांनी कायम एकत्र राहावे, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारत ट्रम्प यांच्या टॅरिफला नक्कीच तोंड देईल आणि या आव्हानाला संधीमध्ये बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.