राष्ट्रपतींचा अपमान, ही तर गांधी घराण्याची पहचान!!
संसदेत अभिभाषण करताना राष्ट्रपती थकल्या. “पूअर लेडी” असे म्हणून सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यावरून देशात मोठा गदारोळ उठला. काँग्रेस सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सोनिया गांधींना त्याबद्दल धारेवर धरले. काँग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका करत सोनिया गांधींनी केलेल्या अपमानाच्या विषयावर स्वतंत्र प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रपती भवनातून देखील राष्ट्रपती थकल्या नसल्याचा स्पष्ट खुलासा केला गेला.