Mahayuti MLA Sanjay Gaikwad : आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही; लोकप्रिय योजनांचा फटका, संजय गायकवाड यांचा दावा; मंत्री सरनाईकांनी फेटाळला
महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.