माओवाद्यांशी लढण्यासाठी गडचिरोलीत पोलिसांना बळ; पोलीस दलासाठी 34 नव्या वाहनांचा ताफा!!
माओवाद्यांशी लढण्यासाठी फडणवीस सरकारने पोलिसांना बळ दिले. गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस आणि 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.