P Chidambaram : ‘जी राम जी’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; चिदंबरम म्हणाले- मनरेगातून गांधींचे नाव काढणे म्हणजे त्यांची पुन्हा हत्या करण्यासारखे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज रविवारी विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) हमी विधेयक, २०२५ (VB-G-RAM-G) ला मंजुरी दिली. आता तो कायदा बनला आहे. हा नवीन कायदा २० वर्षांपूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA) ची जागा घेईल.