FWICE calls : चित्रपट उद्योगाकडून तुर्कीवर बहिष्काराचे FWICEचे आवाहन; म्हटले- देश प्रथम येतो
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने भारतीय निर्मात्यांना तुर्कीएवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. फेडरेशन FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी एक पत्र लिहून सर्व भारतीय चित्रपट निर्मात्यांना तुर्की हे चित्रीकरणाचे ठिकाण निवडण्यापूर्वी विचार करण्याची विनंती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये पाकिस्तानला तुर्कीचा वाढता पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.