Friedrich Mertz : फ्रेडरिक मेर्ट्झ यांची जर्मनीचे चान्सलर म्हणून निवड; दुसऱ्या फेरीच्या मतदानात 325 मते मिळाली
जर्मनीच्या रूढीवादी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्षाचे नेते फ्रेडरिक मेर्ट्झ यांची मंगळवारी जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली. दुसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना ३२५ मते मिळाली. गुप्त मतदानात त्यांना ६३० पैकी ३१६ मते हवी होती, परंतु पहिल्या फेरीत त्यांना फक्त ३१० मते मिळाली, तर त्यांच्या आघाडीकडे ३२८ जागा होत्या.