Tamil Nadu : तामिळनाडूत मालगाडी रुळावरून घसरली, 5 डब्यांना आग; 52 बोगीमध्ये होते डिझेल, 40 वेगळ्या केल्या
मनालीहून कर्नाटकला जाणारी डिझेल मालगाडी जोलारपेटमार्गे तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर तिला आग लागली. सुरुवातीला पाच बोग्यांना आग लागली. रविवारी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली. मालगाडीत ५२ बोगी होत्या.