Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय: महाराष्ट्रात स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण; फ्रेट कॉरिडॉरलाही मंजुरी
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात 1.25 लाख उद्योजक घडतील आणि 50 हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. तसेच वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे.