Eknath Shinde : राहुल गांधी हरतात तेव्हाच आरोप करतात; हा त्यांचा करंटेपणा, एकनाथ शिंदेचा हल्लाबोल
निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे असल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी हरतात तेव्हा आरोप करतात, हा त्यांचा करंटेपणा असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तर राहुल गांधी हे बालिषपणासारखे आरोप करत असून, तो त्यांचा पोरकटपणा असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.