France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स
भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या सतत कमी होत असताना, चीन आपले हवाई दल सतत मजबूत करत आहे, यावर तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, संरक्षणाशी संबंधित एका वेबसाइटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत सरकारने फ्रान्सकडून आणखी ४० राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.