Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल; एका आठवड्यात 2 वेळा बेशुद्ध झाले, MRI आणि वैद्यकीय चाचण्या होणार
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना सोमवारी तपासणीसाठी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांची एमआरआयसह आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या जातील.