Former NSA Bolton : अमेरिकेचे माजी NSA म्हणाले- ट्रम्प यांच्या टॅरिफचा उलट परिणाम; अमेरिकेने; वर्षानुवर्षांची मेहनत वाया, भारत चीन-रशियाकडे जातोय
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन म्हणाले की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत अमेरिकेपासून दूर जात आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतावर एकूण ५०% कर लादण्याच्या निर्णयाला ‘मोठी चूक’ म्हटले. रशियाला कमकुवत करण्यासाठी भारतावर लादण्यात आलेला अतिरिक्त कर उलट परिणाम करू शकतो, अशी भीती बोल्टन यांनी व्यक्त केली आहे.