Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; दिल्लीच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (गुरुजी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते तिथेच दाखल होते. न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती.