Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना
गेल्या सहा महिन्यांत पुणे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक भागांत बिबट्याने धुमाकूळ घालत ३७ जणांचा बळी घेतला. या बिबट्यांना मानवी वसाहतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बिबट्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात जंगलात १ कोटी रुपये किमतीच्या शेळ्या-मेंढ्या सोडा, असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना दिले आहेत.