Forensic technology : फॉरेन्सिक तंत्रज्ञान व पोलीस सक्षमीकरणातून गुन्हे सिद्धतेत भरारी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्याद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांनी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्यासह पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची आणि नवीन ‘रिफ्रेश कोर्सेस’ सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.