Telangana School : तेलंगणाच्या शाळेत दूषित अन्नातून 52 विद्यार्थ्यांना विषबाधा; उलट्या व पोटदुखीच्या तक्रारी, 32 मुलांना डिस्चार्ज, 20 जणांवर उपचार सुरू
तेलंगणातील गडवाल जिल्ह्यातील बीसी रेसिडेन्शियल बॉईज स्कूलमध्ये शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर बावन्न विद्यार्थी आजारी पडले. सुरुवातीला मुलांना १०८ रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार देण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा मुख्यालयातील सरकारी सामान्य रुग्णालयात (GGH) दाखल करण्यात आले. सर्वांना उलट्या आणि पोटदुखीची तक्रार होती.