• Download App
    Floods | The Focus India

    Floods

    Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू

    शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे नेपाळमध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन दिवसांत नऊ जण बेपत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व नेपाळमधील इलाम जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे, जिथे भूस्खलनात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    Sharad Pawar : अतिवृष्टीने केवळ शेतकरीच नव्हे, तर बारा बलुतेदार बाधित; तातडीने उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी

    महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

    Read more

    Marathwada : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिवला ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

    मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

    Read more

    Jayant Patil : जयंत पाटलांची मागणी- राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला; अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती नाही

    राज्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत झालेले नुकसान पाहून पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

    Read more

    NDA : उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी NDA खासदारांचे डिनर रद्द; देशातील अनेक राज्यांत आलेल्या पुरामुळे बदलला निर्णय

    उपराष्ट्रपती निवडणुकीच्या एक दिवस आधी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारा एनडीए खासदारांचा डिनरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच, शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी भाजप खासदारांचा डिनरचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

    Read more

    Pakistani Minister : पाकिस्तानी मंत्री म्हणाले- भारत पाण्याला शस्त्र बनवतोय; जाणूनबुजून पाणी सोडले, ज्यामुळे पूर आला

    पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमधील मंत्री अहसान इक्बाल यांनी भारतावर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भारताने जाणूनबुजून आपल्या धरणांमधून पाणी सोडले, ज्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण पूर आला.

    Read more

    Jammu Kashmir : भूस्खलनातील मृतांमध्ये 34 वैष्णोदेवी यात्रेकरू; जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर; 41 ठार, पुरामुळे रस्ते-पूल तुटले

    गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला.

    Read more

    Pakistan Floods : पाकिस्तानात पुरामुळे 24 तासांत 189 जणांचा मृत्यू; बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू

    पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे २४ तासांत १८९ जणांचा मृत्यू झाला, ज्यात १६३ पुरुष, १४ महिला आणि १२ मुले यांचा समावेश आहे.

    Read more

    South Korea Rain : दक्षिण कोरियात पावसाचा कहर, पूर-भूस्खलनात 14 ठार; 12 बेपत्ता, रस्ते-इमारती पाण्याखाली

    दक्षिण कोरियामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. दक्षिण कोरियातील गॅप्योंग शहरात भूस्खलनामुळे बाधित झालेले लोक मदत छावण्यांमध्ये पोहोचत आहेत.

    Read more

    US New Mexico : अमेरिकेत न्यू मेक्सिकोमध्ये पुरामुळे घरे वाहून गेली, टेक्सासमध्ये आतापर्यंत 100 हून अधिक मृत्यू, 161 बेपत्ता

    मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील अनेक भागांत अचानक पाणी साचले. सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागात रुईडोसो नावाचे डोंगराळ गाव होते. येथील प्रवाह इतका जोरदार होता की अनेक घरे वाहून गेली आणि अनेक लोक अडकून पडले. मदत आणि बचाव पथके सतत काम करत आहेत.

    Read more

    Himachal Pradesh : हिमाचलमध्ये 16 जागी ढगफुटी; पूर-भूस्खलनात 51 मृत्यू, 22 बेपत्ता; वाराणसीत गंगेत बुडाली 20 मंदिरे

    २०-२१ जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सून दाखल झाला. आतापर्यंत २० हून अधिक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. ३० जूनच्या रात्रीच मंडी आणि किन्नौरमध्ये १६ ठिकाणी ढग फुटले.

    Read more

    Himachal Pradesh : धर्मशाळात 15-20 मजूर वाहून गेले, 2 मृतदेह सापडले; कुल्लूत 3 ठिकाणी ढगफुटी, वडील-मुलीसह 3 जण वाहून गेले

    हिमाचल प्रदेशात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. कुल्लू जिल्ह्यातील तीन ठिकाणी, सैंज खोऱ्यातील जीवा नाला, गडसा खोऱ्यातील शिलागड आणि बंजरमधील होरंगध येथे ढग फुटी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका वडील आणि मुलीसह तीन जण पाण्यात वाहून गेले.

    Read more

    Pune Heavy Rain : पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार; पिंपरी चिंचवडमध्ये वाहने पाण्यात वाहून गेली; जनजीवन विस्कळीत

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दिवे घाटात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले, तर पुण्याच्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले होते.

    Read more

    Nepal : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 112 लोकांचा मृत्यू , 64 जण बेपत्ता

    75 टक्के देश अतिवृष्टीच्या विळख्यात आहे. विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळमध्ये  ( Nepal  ) हवामानाचा तडाखा कायम आहे. अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाशी झुंज देत आहे. […]

    Read more

    Heavy rains :अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळात बाधित शेतकऱ्यांना 69 कोटींचा निधी मंजूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील १ लाख २४ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे ६९ कोटी […]

    Read more

    Vietnam : व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळामुळे199 ठार; पूर आणि भूस्खलनात 128 लोक बेपत्ता, शहरे जलमय

    वृत्तसंस्था हनोई : यागी चक्रीवादळामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे व्हिएतनाममध्ये ( Vietnam )  199 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हिएतनामी वृत्तपत्र व्हीएन एक्सप्रेसनुसार, 128 हून अधिक […]

    Read more

    हुकूमशहा किम जोंगकडून 30 अधिकाऱ्यांना मृत्यूदंड; उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात अपयशी ठरले

    वृत्तसंस्था प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन ( Kim Jong ) याने देशातील 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दक्षिण कोरियातील मीडिया टीव्ही […]

    Read more

    Floods :आंध्र-तेलंगणात शाळा बंद, गाड्या रद्द, पुरामुळे कहर!

    floods पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे भीषण पूर, जीवित व […]

    Read more

    न्यूयॉर्क झाले जलमय! पुरामुळे परिस्थिती बिघडल्याने आणीबाणी घोषित

    रस्त्यांना तलावाचे रूप आले असून, वाहनांमध्ये लोक अडकले आहेत. विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क  : पुरामुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे येथे आणीबाणी लागू […]

    Read more

    आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर-भूस्खलनांचे तांडव, 176 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आफ्रिकन देश काँगोमध्ये 2 दिवस मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि महापूर आला आहे. आतापर्यंत 170 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. […]

    Read more

    पाकिस्तानमध्ये पुराचा हाहाकार : एका महिन्यात 300 मृत्यू, 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या पूर आणि पावसाचा सामना करत आहे.पुरामुळे तिथे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही अहवालांमध्ये 304 आणि 314 लोकांचा […]

    Read more

    Assam Floods: आसाममध्ये महापुराचे थैमान, आणखी 12 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 100च्या पुढे, 32 जिल्ह्यांत 55 लाख लोक बाधित

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. बुधवारीही येथे खूप गंभीर परिस्थिती राहिली. ब्रह्मपुत्रा, बराक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, […]

    Read more

    ब्राझीलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे प्रचंड विध्वंस : 3 तासांत 30 दिवसांचा पाऊस, आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू; 400 बेघर

    ब्राझीलच्या रिओ डी जनेरियो राज्यातील पेट्रोपोलिस शहरात पूर आणि भूस्खलनाने कहर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. रिओ दि जानेरोचे गव्हर्नर क्लॉडिओ […]

    Read more

    देशात उत्तर आणि दक्षिणेत पूर आणि भूस्खलनाचा हाहाकार; उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे 47, तर केरळमध्ये पुरामध्ये 27 जणांचा मृत्यू

    सततच्या पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये पूर आला. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे 42 जणांचा मृत्यू झाला. […]

    Read more

    पावसाचा कहर : केरळात आतापर्यंत 41 ठार, इडुक्की धरणाची पाणी पातळी वाढली, उत्तराखंडमध्येही अलर्ट

    प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पावसाचा कहर दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ […]

    Read more