Anna Hazare : पुण्यातील ‘अण्णा आता तरी उठा’ फ्लेक्सवर अण्णा हजारेंची नाराजी; म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून देशातील तरुणाईला देखील चांगलेच खडसावले. मी दहा कायदे आणले आहेत, पण 90 वर्षांनंतरही मीच सगळे करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.