Karuna Munde : मुंडेंना माझ्या फ्लॅटमध्ये राहू द्या, मी निघून जाईन; करुणा मुंडेंचा टोला; म्हणाल्या – 6 महिन्यात त्यांची आमदारकी रद्द होणार
धनंजय मुंडे यांनी लाज सोडली आहे. त्यांचे मुंबईत मलबार हिल, हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे. माझा फ्लॅट हा देखील त्यांचाच आहे. त्यांना जर हिरानंदानी आणि मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये रहावे वाटत नसेल तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहू शकतात, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधीच येणार नाही. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. कालच त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.