CM Fadnavis : पार्थ पवारांवर अद्याप का गुन्हा नाही? मुख्यमंत्री म्हणाले- FIR मध्ये नाव आले म्हणजे व्यक्ती दोषी आहे असे होत नाही
पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडलेत. त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.