सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या शिक्षणावरून टीका केली होती. रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, अजित पवार दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नसल्याची टीका दमानिया यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अजित पवारांची बाजू मांडली. वडिलांच्या निधनामुळे अजित दादांना शिक्षण सोडावे लागले होते. यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून अतिशय संवेदनशील घटना असल्याचे चाकणकर यांनी म्हटले होते. यावरून आता अंजली दमानिया यांनी पुन्हा ट्विट करत यावर प्रत्युत्तर दिले आहे.