Finance Commission : वित्त आयोगाकडून महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र शासनाची 16व्या वित्त आयोगा’समवेत बैठक संपन्न झाली. यावेळी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे तसेच देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीत राज्याच्या मोलाच्या सहभागाचे कौतुक केले.