Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.