February : फेब्रुवारीत व्यापार तूट कमी घटून 1.21 लाख कोटींवर; ऑगस्ट 2021 नंतरची सर्वात कमी तूट
निर्यातीत वाढ झाल्यामुळे, भारताची मर्चेंडाइज ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट फेब्रुवारी २०२५ मध्ये १४.०५ अब्ज डॉलर्स (१.२१ लाख कोटी रुपये) पर्यंत कमी झाली. गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये ते २२.९९ अब्ज डॉलर (१.९९ लाख कोटी रुपये) होते. ही तूट ऑगस्ट २०२१ नंतरची सर्वात कमी आहे.