Maharashtra government : फडणवीस सरकारची अॅक्शन- गुटखा माफियांना चाप, उत्पादक आणि विक्रेत्यांवर लागणार थेट मोक्का!
राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास मिळणाऱ्या गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने, आता गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षात या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.