द फोकस एक्सप्लेनर : ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात फतवा; इराणचा इशारा केवळ धमकी की मोठ्या युद्धाची सुरुवात?
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव गंभीर वळण घेण्याआधीच अमेरिकेने मध्यस्थी केली आणि सध्यातरी शांतता पसरली. पण ही शांतता तात्पुरती आणि एकतर्फी वाटते. कारण इराणमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. या दोघांना ‘मोहरिब’ म्हणजेच ‘अल्लाहचे शत्रू’ ठरवून त्यांना शिक्षा देण्याचे आवाहन केले गेले आहे. यासाठी इराणच्या धर्मगुरूंनी इतर इस्लामिक देशांनाही एकत्र येण्यास सांगितले आहे.