Fatehpur : फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; इंजिन रुळावरून घसरले
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे मंगळवारी सकाळी दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेनंतर एका मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले. या अपघातात लोको पायलट आणि गार्ड जखमी झाल्याचे वृत्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर लाईनवरील खागा कोतवालीच्या पंभीपूर गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.