आज एकाच दिवशी पुतिन यांचा मोदींना फोन कॉल; चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले!!
ट्रम्प तात्यांची बडबड आणि रशिया – युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडींना उत आला असताना आज एकाच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःहून फोन कॉल केला आणि त्याच दिवशी चीनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. या दोन महत्त्वाच्या घटनांचा राजकीय योगायोग राजधानीत घडल्या.