FASTag : नवे नियम : समोरच्या काचेवर फास्टटॅग न लावणारे ब्लॅकलिस्ट होणार; हाताने फास्ट टॅग दाखवणाऱ्यांवर सरकारची कारवाई
‘लूज फास्टॅग’ असलेल्या वापरकर्त्यांना आता ब्लॅकलिस्ट केले जाईल. जे महामार्ग वापरकर्ते जाणूनबुजून वाहनाच्या विंडस्क्रीनवर फास्टॅग लावत नाहीत त्यांना ‘लूज फास्टॅग’ किंवा ‘टॅग-इन-हँड’ म्हणतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नुसार, यामुळे ई-टोल संकलन प्रणालीमध्ये व्यत्यय येतो आणि इतर प्रवाशांना गैरसोय होते.